पॉलिटेक्निक आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. समर 2022 चा रिझल्ट लागल्यापासून पॉलिटेक्निक तसेच फार्मसी चे विद्यार्थी एटीकेटी न लागल्यामुळे पुढील वर्षाला ऍडमिशन घेउ शकले नाही. पण MSBTE बोर्डानेमागील वर्षांमध्ये फेल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू केला आहे म्हणजेच फेल झालेले विद्यार्थी पुढील वर्षाचे क्लासेस प्रॅक्टिकल सबमिशन इत्यादी करू शकतात एम एस बी टी इ बोर्डाने दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेशास अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना covid 19ची परिस्थिती बघता विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला त्यासाठी अशा विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक विशेष बाब म्हणून अशा सर्व ATKT न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढील वर्षांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एक वेळ संधी (one Time opportunity)दिलेली आहे.
1. पॉलिटेक्निक आणि फार्मसी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक वर्ष दोन हजार
बावीस तेवीस मध्ये तिसऱ्या व पाचव्या सेमिस्टर चे तर फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण शैक्षणिक वर्षाचे
इंटरनल सबमिशन, प्रॅक्टिकल, इत्यादी पूर्ण करावे लागेल आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण करणाऱ्या
विद्यार्थ्यांनाच चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टर मध्ये पुढील सत्र कर्म पूर्ण करून घेण्यासाठी संधी
मिळेल.
2. पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या व पाचव्या सेमिस्टर मध्ये जे विद्यार्थी रेगुलर क्लासेस सबमिशन
प्रॅक्टिकल कम्प्लीट करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना डिटेन केल्या जाईल आणि त्यांनी ही
मिळालेले संधी गमावली आहे असे समजण्यात येईल म्हणजेच त्यांना चौथ्या आणि सहाव्या सत्रात
प्रवेश मिळणार नाही.
3. डिप्लोमा फार्मसी च्या द्वितीय वर्षाचे सत्र कर्म पूर्ण न केल्यामुळे डिटेन होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संधी
गमावली आहे असे समजण्यात येईल आणि ज्या वेळेस ते पात्र होतील त्यावेळेस त्यांना पुन्हा द्वितीय
वर्षात प्रवेश घेणे अनिवार्य राहील.
4. जे फर्स्ट इयर मध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी विंटर 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये एटी-केटी
मिळवतील किंवा मागील राहिलेले सर्व विषय पास करतील अशा विद्यार्थ्यांना तीसर्या आणि चौथ्या
सेमिस्टर चे पेपर हे समर 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये देता येतील तसेच द्वितीय वर्षांमध्ये अनुत्तीर्ण
झालेले विद्यार्थी 2022 मध्ये होणारे परीक्षेमध्ये एटीकेटी मिळवतील मागील सर्व विषय पास करतील
अशा विद्यार्थ्यांना पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टर चे पेपर हे समर 2023 मध्ये होणारे परीक्षेमध्ये देता
येतील.
5. समर 2022 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस केल्या गेली होती अशा
विद्यार्थ्यांना ही एक वेळची संधी मिळणार नाही.
6.एक वेळ संधीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी संस्थेच्या लॉगीन मध्ये उपलब्ध केली जाईल एक वेळ
संधी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संस्थेने मंडळाच्या ऑनलाईन पद्धतीप्रमाणे रजिस्ट्रेशन करणे
बंधनकारक राहील तसेच मंडळाच्या विभागीय कार्यालयाने रजिस्टेशन निश्चित केलेल्या
विद्यार्थ्यांना एक वेळ संधी देण्यात येईल.
7. अशा पद्धतीने जे विद्यार्थी मागील राहिलेले विषय पास करतील किंवा एटीकेटी मिळवतील त्या
विद्यार्थ्यांनाच चालू वर्षाच्या सेमिस्टर चे परीक्षा अर्ज भरता येतील.
8. ज्या विद्यार्थ्यांनी सेमिस्टर पूर्ण केलेले आहे त्या सेमिस्टर मधील सर्व विषयाचे टर्मवर्क, प्रॅक्टिकल
फाईल ,मॅन्युअल ,प्रॅक्टिकल सबमिशन सांभाळून ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील नंतर
परीक्षेला पात्र झाल्यावर ओरल किंवा प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी हे सर्व टर्मवर्क, प्रॅक्टिकल फाईल
,मॅन्युअल ,प्रॅक्टिकल सबमिशन सादर करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील.